संचारबंदी कालावधीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना "वर्क फ्रॉम होम" ची मुभा देण्यात यावी- शेख अब्दुल रहीम

Maharashtra
Teachers to non-teaching staff during curfew "Work from home" should be allowed - Sheikh Abdul Rahim

संचारबंदी कालावधीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना

"वर्क फ्रॉम होम" ची मुभा देण्यात यावी- शेख अब्दुल रहीम

 

औरंगाबाद- महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ एप्रिल २०२१ मध्यरात्रीपासून ते दिनांक १ मे २०२१ पर्यंत राज्यात संचारबंदी घोषित केली आहे. या संचारबंदी काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वे, बस अशी सार्वजनिक वाहतुकीची साधने वापरण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रेल्वे, बस अश्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांतून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण सुरू ही निरंतर अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू आहे. शिक्षक ऑनलाईन माध्यमांचा वापर करून विद्यार्थ्यांनाअध्यापनाचे कार्य आणि शालेय कामकाज करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि शासनाने घोषित केलेली संचारबंदी या काळात शिक्षकांना प्रत्यक्ष शाळेत न बोलविता "वर्क फ्रॉम होम" ची परवानगी देण्यात यावी. असे आपल्या कार्यालया तर्फे लेखी आदेश काढून सर्व मुख्याध्यापकांना त्वरित आदेशीत करावे अशी विनंती ची मांगणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी औरंगाबाद विभागाचे मा.शिक्षण उपसंचालक साहेब, मा.शिक्षणाधिकारी साहेब (माध्यमिक व प्राथमिक) यांना ईमेल आणि व्हाट्सप्प द्वारे दिलेल्या निवेदनाद्वारे  यांच्याकडे करण्यात आली आहे.